पर्यावरणीय प्रदूषणासाठी हानिकारक घटक-
मानव व त्याच्या सभोवताली असणारे पर्यावरण यांचा अतिशय घनिष्टसंबंध आहे.पृथ्वीवरील सजीव सृष्टी निकोप राहण्यासाठी स्वछव सुंदर पर्यावरणाची अवशकता असते. पर्यावरण शुद्ध ठेवण्यासाठी मानव व पर्यावरण यांचे संतुलन कायम ठेवणे आवश्यक असते. मानवाच्या बहुतांश गरजा पर्यावरनातूनच भागविल्या जातात. मागील शतकांपासून प्रचंड प्रमाणात वाढलेली लोकसंख्या व औद्योगिकीकरणामुळे पर्यावरण व मानव यांतील समतोल केव्हा व कसा ढासळला हे मानवाच्या लक्षात आले नाही. अति लोभा पायी मानवाने मोठ्या प्रमाणात पर्यावरण अशुद्ध केले. वाढत्या लोकसंख्येचे पालनपोषण करण्यासाठी मानवाने अविचारणे नैसर्गिक साधनसंपतीचा वापर करून निसर्गाचा पर्यायाने नाश केला. पर्यावरणाचे संतुलन बिघडले. पर्यावरणाच्या अनुषंगाने ज्या परिसंस्था निर्माण झाल्या, विकसित झाल्या त्यांचेही संतुलन बिघडले. अनेक प्रकारे पर्यावरण दूषित केले. ज्या घटकाद्वारे पर्यावरण दूषित केले जाते. त्यांना दूषितके म्हणतात. दूषितकांद्वारा जेव्हा पर्यावरण दूषित होऊन मानव व पर्यावरणाचा टोल ढासळतो तेव्हा त्या प्रक्रियेस प्रदूषण असे म्हणतात.
पृथ्वीच्या पृष्टभागातील जीवसृष्टी ज्या विशिष्ट परिस्थितीत जगते त्या पार्श्वभूमीला पर्यावरण असे म्हणतात. मानवाच्या सभोवताली निसर्गातील विविध घटकांची मिळून पर्यावरण निर्माण झालेले असते. हे पर्यावरण मानव,प्राणी,वनस्पति यासारख्या सजीवांना जगण्यासाठी उपयोगी पडते. परंतु जर पर्यावरणात मानवासह सर्व सजीवांना हानिकारक किव्हा प्रतिकूल ठरणार्या घटकांच्या प्रवेश झाला तर ते पर्यावरण मानवासह सर्व सजीवांना घातक ठरते. यालाच प्रदूषण म्हणतात.

प्रदूषणाचा अर्थ-
प्रदूषण या शब्दाचा अर्थ केवळ एक दोन वाक्यात सांगता येणार नाही. सर्वसामान्यपणे असे सांगता येईल की, पर्यावरणात निर्माण होणार्या किव्हा केल्या जाणार्या अपायकारक पदार्थांना दूषितके असे म्हणतात. दूषितकांमुळे पर्यावरण दूषित होणार्या क्रियेला प्रदूषण असे म्हणतात.

व्याख्या :
१)वातावरणातील धूळ, वायू, धूर, बाष्प,धुके,त्याज्य पदार्थ इत्यादि घटक किव्हा समुहांमुळे वनस्पति व प्राणी जीवनास अपायकारक ठरलेले पर्यावरण म्हणजे प्रदूषण होय.
२) मानवी क्रियांमुळे आपल्या भोवतालच्या परिस्थितीत पुर्णपणे किव्हा काही प्रमाणात झालेला फेराफार म्हणजे प्रदूषण होय.
प्रदूषणाच्या वरील व्याख्येवरून असे स्पष्ट होते की पर्यावरणातील अपायकारक घटकांमुळे पारयावरणाचे संतुलन बिघडते. म्हणून अशा दूषित झालेल्या पर्यावरणास प्रदुषण असे म्हणता येईल.
प्रदूषणाचे प्रकार-
पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पति,मानव व इतर प्राणी ज्या पर्यावरणात किव्हा परिसरात राहतात त्या पर्यावरणात विविध घटकांत संतुलन झालेले असते. सजीवांच्या एका जातीने त्याज्य केलेली वस्तु दुसर्या` एखाद्या जातीला पोषनासाठी इष्ट असू शकतात. अशा परस्परावलंबनामुळे पर्यावरणाची संरचना टिकून राहते. तथापि सध्याच्या अनिर्बंध मानवी संस्कृतीमुळे पृथ्वीच्या पर्यावरणातील नेहमीच्या घटका व्यतिरिक्त इतर अपाय कारक घटक हे मोठ्या पप्रमाणावर पर्यावरण सोडले जाते. असे विविध घटक पर्यावरणात जसेच्या तसे सोडून दिल्यामुळे पर्यावरणाच्या विविध घटकातील संतुलन बिघडते व त्यामुळे पृथ्वीवरील वनस्पति व प्राणी यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. अशा विविध क्रिया प्रक्रियांमुळे प्रदूषण घडू शकते. लोकसंख्या वाढ, वाहतूक व इंधन इ. जंगलतोड, खानकाम, रासायनिक खते व जंतूंनाशकांचा वापर इ. विविध कारणांमुळे प्रदूषण घडून येते. याशिवाय प्रदूषण मुख्यते नैसर्गिक व सांस्कृतिक खटकांमुळे होतो. यावरून नैसर्गिक व सांस्कृतिक प्रदूषण असेही दोन प्रकार पडतात. उदा.ज्वालामुखीमुळे होणारे प्रदूषण हे नैसर्गिक प्रदूषण आहे. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या कारणांनी प्रदूषण हे होत असते.

फोटो छायांकन - इंटरनेट
सादरकर्ता- विकास अशोक दौंड
सादरकर्ता- विकास अशोक दौंड
एम.जे.एम.सी.प्रथम वर्ष
के.टी.एच.एम कॉलेज, नाशिक
No comments:
Post a Comment