वनस्पती विश्व
वनस्पती म्हणजे काय?
फोटो छायांकन -इंटरनेट
सादरकर्ता -विकास अशोक दौंड
एम.जे.एम.सी - प्रथम वर्ष
के. टी. एच. एम. कॉलेज
वनस्पती म्हणजे काय?
आपण आपल्या हौसेसाठी घरात काही छोटी झाडे लावतो, रसत्यवर झाडे लावलेली असतात ती मोठी ही असतात तसेच बागेत ही ठीक ठिकाणी गवत असते व मोठेमोठे वृक्ष असतात. शेतात पिके व त्यांच्या बांधावर काटेरी झुडपे असतात. नदीच्या पाण्यावर शेवाळ व जल वनस्पति असतात. या सर्वांना ‘वनस्पती’ म्हंटले जाते. ज्या प्रकारचे हवामान असते त्यानुसार तिथे जमिनीतून उगवून येणार्या संपत्तीला ‘वनस्पती’ म्हणतात. सर्व वनस्पतींची पाने साधारणपणे हिरव्या रंगाची असतात. अनेक वृक्ष एकत्र वाढलेले असले की त्याला ‘जंगल’ किंवा वन म्हणतात.
ज्या प्रदेशात ज्या प्रकारची माती, हवामान, पाऊस असतो; या घटकांवर वनस्पती अवलंबून असल्याने टी प्रकारच्या वनस्पती त्या त्या ठिकाणी आढळतात. यातील वनस्पतीवर सर्वात जास्त प्रभाव हवामनचा होतो. भुपृष्टाच्या उंचीनुसार तापमानवर परिणाम होतो व त्यांचाही परिणाम वनस्पतींवर होतो. अतिथंड व अतिउष्ण प्रदेशात वनस्पती कमी प्रमाणात पाहावयास मिळतात. अतिथंड म्हणजे ध्रुवीय हिंमक्षेत्रात सर्वत्र बर्फ असल्याने वनस्पती कमी असतात. उन्हाळ्यामद्धे तिथे छोट्या फुलांची झाडे, शेवाळे याप्रकारे अल्पकाळ टिकणार्या वनस्पती दिसतात, तर अति उष्ण म्हणजे वाळवंटी प्रदेशात निवडुंग, काटेरी झाडे, अगदी छोटी झाडे-झुडपे बघायास मिळतात.
वनस्पतींचे महत्व-
‘वनस्पती’ ही स्वतः सजीव आहे व ती सर्व सजीवनसाठी उपयूक्त आहे. वनस्पती ही नैसर्गिक संपती आहे. या संपतीचा आपणास वेगवेगळ्या तर्हेने उपयोग होत असतो. त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रकारही आहेत. तुळस, आवळा, जांभूळ, पपई, एरंड, कोरफड या औषधी वनस्पती म्हंटल्या जातात. बभुल, बोर, सीताफळ यांची झाडे झुडपाच्या स्वरुपात मोडतात. तर आंबा, चिंच, पिंपळ, वड, अदुंबर ही झाडे ‘वृक्ष’ म्हणून ओळखली जातात. भोपळा, घोसवळे, कारले, दोडके या वेळ वर्गीय वनस्पती आहे. गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी ई. मुळे आपणास अन्नधान्य मिळते. ही पिके गवत या स्वरुपात मोडतात. आपणास वेगवेगळ्या प्रकारची, रंगांची फुले बघावयास मिळतात. काही फुले सुवासिक तर काही रंगेबेरंगी. मोगरा, मदनवन, जाई, जुई या फुलांचा रंग पांढरा असला तरी त्यांचा वास मंद व मनाला आनंदित करणारा असतो. गुलाब, जास्वंद, लिलि, साधफुली, कर्दळ या फुलांचे रंग फारच मनमोहक असतात. या शिवाय फळांमध्ये सफरचंद, चिक्कू, डाळिंब, पेरु, जांभूळ, आंबा, फन अशी वेगवेगळ्या चवीची व वेगवेगळ्या मोसमात मिळणारी फळे हे सर्व मांनवनिर्मित नसून निसर्गाची देणगीच आहे. मातीमध्ये सगळीकडे सारखेपणा दिसत असला तरी त्यात थोडा फार फरक असतो. ज्या भागात जसा खडक असेल त्या प्रकारची माती तिथे असते. याच माती मध्ये वेगवेगळ्या वासांची, रंगांची, चवीची फळे-फुले यांची झाडे आसतात. अति उष्ण तापमानात म्हणजे ४५ अंश से. पेक्षा जास्त व अति थंड तापमानात म्हणजे ० अंश से. पेक्षा कमी तापमानात वनस्पती जगू शकत नाही. जास्त तापमानात व जास्त पाऊस असल्यास तिथे उंच घनदाट जंगले वाढलेली दिसतात. तापमानावरून उष्ण कटिबंध समशीतोष्ण कटिबंध व शीत कटिबंध असे विभाग केले आहे. समशीतोष्ण व उष्ण कटिबंधात वनस्पती असून दोन्ही वनस्पतीमध्ये फरक दिसतो.
सादरकर्ता -विकास अशोक दौंड
एम.जे.एम.सी - प्रथम वर्ष
के. टी. एच. एम. कॉलेज
Wynn Las Vegas casino review 2021 - DRMCD
ReplyDeleteA full Wynn review. 의정부 출장마사지 All 화성 출장안마 you need 논산 출장마사지 to 강릉 출장안마 know about Wynn Las Vegas casino: games, customer support, deposit options, 부산광역 출장마사지 games,