जोपासना पर्यावरणाची
वनस्पतींचे प्रमाण कमी झाल्यास हवेत कार्बन डाय ओक्साइडचे प्रमाण वाढेल. यायोगे पृथ्वीवर तापमानात वाढ होत राहणार. लोकसंख्या वाढल्याने अन्नधान्याची गरज वाढली. यासाठी जंगलतोड करून शेतीचा विस्तार वाढू लागला. यामुळे वनस्पतींचे प्रमाण कमी झाले. तेव्हा पर्यावरणाचा समतोल राखण्यासठी ठराविक प्रमाणात वनस्पति आवश्यक आहे. याचा अर्थ ज्या भागात जशी लोकसंख्या आहे त्या भागत जमिनीचे ठराविक क्षेत्र जंगलासाठी, शेतीसाठी तसेच रस्त्यांसाठी हवे. म्हणजे जमिनीच्या उपयोगाचे नियोजन करावे लागते. हे करताना त्या ठिकाणचे हवामान, जमिनीचा चढउतार अशा अनेक घटकांचा विचार करावा लागतो.
एखाद्या भागात ओढे, नाले, झरे, नद्या तसेच विहिरी, तलाव या जल साठ्याच्या प्रकारापैकी कोणते जल साठे आहे, त्यामध्ये पाणी किती प्रमाणात आहे, हे पाणी तिथे असलेल्या सजीवांच्या पिण्याच्या गरजांसाठी किती प्रमाणात, उध्योगांसाठी किती प्रमाणात वापरू शकतो याचा विचार करावा लागतो. मानव पशू-पक्षी यांना पिण्यासाठी पाणी प्रथम पुरावे लागते. त्यांनातर शेती, झाडे, वनस्पति, तसेच उद्योग धंद्याच्या पाण्याची गरज बघितली जाते. अलीकडे ठिकठिकाणी ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ ही मोहीम चालू आहे. याचे कारण म्हणजे वनस्पतींमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते. जमिनीतील मुरलेले पाणी भूमिगत जलसठयणा मिळते. यासाठी जमिनीवर वनस्पति असणे आवश्यकआहे. अलीकडे लोकसंख्या वाढल्याने वस्त्या वाढल्या आहे. शेट जमीन अथवा वृक्ष लागवडीच्या जमिनीवर मोठमोठ्या ईमारती झालेल्या आढळतात. मात्र आजूबाजूचा परिसर सगळा वृक्ष ओसाड वाटतो. तेव्हा प्रथम बंधारे बांधून पाणी अडविणे, पाणी जिरविणे महत्वाचे आहे. तसेच पावसाळयापूर्वी रिकाम्या जागेत, जवळच्यापरिसरात,शेताजवळ खडे खोदुण ठेवावे निरनिराळ्या झाडांची रोपे आणून जमा करून पावसाळा सुरू झाल्यावर
त्यांची लागवड करावी. खताच्या मातीचा व छोट्या खड्ड्यांचा उपयोग त्यावेळी करावा. पावसाळ्यात लावलेली रोपे जमिनीत रुजून तग धरून मोठी होऊ लागतात. या वनस्पतींचे सरक्षण करणे गरजेचे आहे. एकावेळी एकच झाड न लावता अनेक झाडे लावावीत. त्यातील काहीच तग धरतात. त्यांची योग्य प्रकारे काळजी करून जोपासना करावी. पावसाळा व त्यानंतर येणार्या हिवाळ्यात वनस्पतींच्या वाढीचा विशेष प्रश्न येत नाही. परंतु त्यानंतर उन्हाळ्यात कडक उन्हामुळे वनस्पति मारण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात जर वनस्पतींना थोड्या प्रमाणात सावली मिळाली, मुळाणापाणी मिळाले तर झाडे मारत नाही. तेव्हा रोपांना कडक उन्हात सावली मिळण्यासाठी सावलीचे आच्छादन असावे. मुळांजवळ ओलावा म्हणजे पाणी असावे यासाठी पाणी घालावे. अशा रोपांजवळ पाण्याने भरलेले मडके ठेवले तर त्यातील पाझरलेले पाणी रोपांना मिळत राहते. पाणी घालताना मुळावरची माती वाहून न जाणार याची काळजी घ्यावी. ही लहान लहान रोपे थोडी वाढून मग त्याचे झुडुप होते. झुडपानंतर हळूहळू ते मोठे होऊन त्याचे झाड होते. रोपापासून झुडुप बनेपर्यंतच्या काळात मात्र रोपांची योग्य ती काळजी घ्यावी लागते. वृक्ष झाल्यावर त्याचा पसारा वाढल्यावर त्याची सावली वाढते. तसेच त्यांची मुळे जमिनीत खूप खोलवर जातात व त्यामुळे जमिनीत पाणी टिकून ओलावा राहतो. पर्यावरणाचा समतोल राहण्यासाठी साधारणपणे मैदानी परदेशात जमिनीच्या क्षेत्रफळाच्या ठराविक टक्के जमिनीवर वृक्ष वनस्पतींचे आच्छादन हवे. तसेच वृक्ष सवर्धन, पीक सवर्धन यासाठी पुरेशा जलसिंचांनाच्या सोई आवश्यक आहेत. सेंद्रिय खतांच्या वापरणे पिकांची मुळे घट्ट रुततात, पीक जमिनीवर लोळण घेत नाही. आधुनिक शेती मध्ये जास्त प्रमानात खते, जंतु नाशके वापरल्यामुळे मृदा प्रदूषण होण्याची शक्यता असते. जंगलतोढीमुळेही मृदेची धूप होते. तेव्हा झाडांचे सवर्धन झालेच पाहिजे. दुष्काळी भागात ‘ पाणी आडवा पाणी जिरवा’ अशा प्रकारची योजना राबवावी यामध्ये पावसाचे पाणी जिथल्या तिथे जमिनीत जिरवण्याच्या दृष्टीने ठिकठिकाणी बंधारे घालावे. या योगे पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत जिरू शकते. हे जिरलेले पाणी विहिरी, तलाव, तळी याद्वारे पुन्हा उपयोगी येते.

याप्रमाणे प्रत्यक भूखंडात पावसाचे पाणी जमिनीत व टाकीत साठवून पाण्याची उपलब्धता आपणच वाढवावी. याला ‘रेन वॉटर हर्वेस्टिंग’ म्हणतात. अशा प्रकारे पाणी जपून वापरावे. वृक्ष वा ओसाड परिसरात वनस्पतींची जोपासना करावी. तसेच आपणास जसे शक्य होईल तसे झाडे लावावी व आपला परिसर निसर्गमय कराव.
फोटो छायांकन - इंटरनेट
सादरकर्ता- विकास अशोक दौंड
एम.जे.एम.सी. प्रथम वर्ष
के.टी.एच.एम.कॉलेज