Friday, March 18, 2016

ध्वनि प्रदूषण

ध्वनि प्रदूषणाचे परिणाम
ध्वनि म्हणजे आवाज होय. जे ध्वनि ऐकून आपल्याला त्रास होतो, त्याला गोंगाट म्हणतात. ते आवाज किंवा ते ध्वनि आपणास ऐकायला नकोसे वाटतात, अस्वस्थ वाटते. कंठाळ्या बसतात. अशा  कर्कश आवाजापासून
ध्वनिप्रदूषण होते. सहन न होणारा कर्कश, गोंगाट, मोठा आवाज हा यातनादायक, मानसिक शांतता व एकाग्रता नष्ट करणारा,, रक्तदाब वाढतो, हृदयाचे ठोके वाढतात. चिडचिडेपणा वाढतो. अशा संतापजनक आवाजाला ‘ध्वनिप्रदूषण’ म्हणतात. जे ध्वनि ऐकायला मधुर,गोड वाटतात, अशा शांत ध्वनिमुळे मनाची एकाग्रता व प्रसन्नता वाढते. मधुर संगीतश्रवनामुळे गाई जास्त दूध देतात. पक्षी,प्राणी यांची उत्पादन क्षमता वाढते. श्रम करण्यास हुरूप येतो. कुक्कुटपालन केंद्रामध्ये मधुर ध्वनि श्रवणामुळे कोंबड्यांच्या अंड्यांचे उत्पादन वाढल्याचे प्रयोगात आढळून आले आहे. मधुर ध्वणींमुळे वनस्पतींची व पिकांची वाद चांगली होते. डॉल्फिन या सागरी माशांना संगीत आवडते. गुरांना पाणी पाजताना शीळ घालतात. गुरांची तहान समाधानाने शांत होतात. मधुर ध्वनि ऐकल्याने अभ्यास चांगला होतो. नेहमी हळू व सौम्य बोलावे. मोठयाने बोलू नये. कर्कश मोठा नकोसा वाटणारा आवाज ऐकणार्‍याला बहिरे व तापट बनवतो. एखादे गाणे ऐकणार्‍याला संगीत म्हणून आवडेल, तर तेच गाणे दुसर्‍याला गोंगाटाचे वाटू शकेल. गोंगाटमुळे लक्ष विचलित होते. एकाग्रता नष्ट होते व त्यामुळे कार्याला अडथळा निर्माण होतो. त्रासदायक आवाज म्हणजे ध्वणीप्रदूषण होय. आपल्याकडे अनेक मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात मोठमोठ्या आवाजाचे ‘ध्वनीक्षेपक’ (लाउडस्पीकर) वापरतात. कंठाळ्या बसविणारे फटाके वाजवितात. त्याने मानसिक तान आणि अस्वस्थता वाढते. म्हणून मोठा आवाज ऐकण्यास घातक असतो. तर लहान आवाज मंजुळ स्वरांनी सजले, तर ऐकायला गोड वाटतात. ध्वनिची तीव्रता ही ‘डेसिबल’ या एकतात (परिमानात) मोजतात. म्हणजेच ध्वनीचे मापन हे डेसिबल मध्ये करतात.
1)कारखाने व उद्योग धंद्यातील आवाज: अनेकदा कर्कश आवाजापासून मुक्तता व्हावी म्हणून लोक नाईलाजास्तव कानात कापसाचे बोळे घालतात. यंत्राच्या मोठा खडखडाट होतो. कारखान्यांच्या आवाजाची तीव्रता 100 ते 120 डेसिबल असते. त्यासबंधी कायदे पाळण्याबाबत अनास्था दिसते. ध्वनि प्रदूषण नियंत्रण व्यवस्था नियंत्रणाचे काम प्रभावीपणे करत नाही. कारखान्यांद्वारे होणार्‍या ध्वनिप्रदुशनामुळे बहिरेपणा येतो.
2) वाहनांचे ध्वणीप्रदूषन :स्वयंचलित वाहने, विमाने, रॉकेट, ट्रक, कार, ट्रॅक्टर, स्कूटर, रिक्षा, मोटर सायकली, मोटारी, रेल्वेगाड्या यांच्या आवाजामुळे ध्वणीप्रदूषण होते. इंजिन व हॉर्न यांच्या कर्कश आवाजाने ध्वनिप्रदूषणात भर पडते. उपग्रह प्रक्षेपणाचे हवाईउड्डाण होतांना असहय आवाज निर्माण होतो. मोठ्या शहरांमध्ये सदैव वाहनाची वर्दळ असते. रेल्वे गाड्यांची रात्रंदिवस ये-जा चालू असते. त्यामुळे त्यांच्या त्या खडखड आवाजाने शहरात व महामार्गाच्या परिसरात ध्वनीचा खडखडत निर्माण करते. विमानतळावर विमान उड्डाण करताना व विमान उतरताना ध्वणीप्रदूषण होते. ट्रक, ट्रकटर्स यांच्याही आवाजामुळे ध्वणीप्रदूषण होते. बाजारपेठेतूनही विक्रेत्यांची आरडाओरड व वाहनांद्वारे ध्वणीप्रदूषण होते. 
3) घरगुती आवाज व सार्वजनिक करमणूक केंद्र :घरात फ्रीज, मिक्सर, कपडे धुण्याचे यंत्र, प्रेशरकुकर, दळण यंत्रे, याचबरोबर टी.व्ही., रेडियो, पंखे वाद्ये यांचा आवाज तीव्र केल्याने ध्वणीप्रदूषण होते स्वयंपाक घरातील भांड्यांची खडखड, सतत बडबड करणे, तसेच सतत भांडणे व धार्मिक कार्यक्रम यातूनही ध्वनि प्रदूषण होते. तसेच चित्रपट गृहे, नाट्यगृहे, सर्कस, गाण्यांचे कार्यक्रम सादर करताना त्यातील लाउडस्पीकर मोठा केल्याने ध्वणीप्रदूषण होते. तसेच विविध वाद्यांचे एकदम मोठयाने ऐकू येणारे आवाज धोकादायक असतात. अशा नाट्यगृहेशेजारी रहिवाशांना या आवाजामुळे त्रास होतो, शांत झोप लागत नाही. 

ध्वणीप्रदूषनाचे विविध परिणाम

1) ध्वणीप्रदूषनाचा आरोग्यावर होणारा परिणाम :कायमचा गोंगाट व कर्कश आवाजामुळे बहिरेपणा येतो. मानसिक स्वास्थ्य बिघडते. चिडखोरपणा वाढतो. निद्रानाश, अपचन, दुर्बलता, विस्मरण इ. निर्माण होते. गोंगाटमुळे घाम येतो, चक्कर येतात, थकवा येतो. मानसिक विकृतींचे आजार बळावतात. ध्वणीप्रदूषनामुळे चांगली झोप लागत नाही, कार्यक्षमता घटते, मनाची एकाग्रता नष्ट होते. ध्वणीप्रदूषनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासवर परिणाम होतो. मानसिक आजारपण, भावनिक तान, वाढतो. काम करण्याची शक्ति कमी होते. उत्साह कमी होतो, लगेच थकवा येतो, अभ्यासात अडथळे येतात, गर्भवती स्रीच्या गर्भावर, तसेच तिच्या वडीवर अनिष्ट परिणाम होतो. ध्वणीप्रदूशनापासून त्रास होऊ नये म्हणून काही लोक झोपेच्या गोळ्या घेतात, तसेच धूम्रपान सेवन करून व त्यातून आजार वाढून अशक्तपणा येतो. छातीत धडधड होते, हृदयाच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. व त्यामुळे रक्तदाबासारखा आजार उत्पन्न होतो. व त्यामुळे अनेक रोगांत वाढ होते.
2) पक्षी, प्राणी व ध्वणीप्रदूषण :प्रचंड ध्वनिमुळे पक्षी, प्राणीही अस्वस्थ होतात. ते घाबरून इतरत्र स्थलांतर करतात. प्राण्यांची वाढ खुंटते. प्राणी पक्षी सैरभैर होतात, हरिण, हत्ती इ.वन्यजीव आळशी बनतात. व त्यामुळे त्यातच त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे प्राण्यांपाशी ध्वणीप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी.
ध्वनिप्रदुषनावर उपाय 
1) आवाज कमी करण्यावर उपाय : कारखान्यातील यंत्रे व सर्व प्रकारच्या वाहनांचा आवाज कमी करणारी यंत्र सामग्री शोधणे, व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्राचे आवाज कमी करणारी उपकरणे निर्माण करणे उपयुक्त ठरेल. तसेच यंत्रांना सायलनसर बसवावेत.त्याच प्रमाणे सर्व वाहनांना ते नीट बसलेले आहे की नाही ते चेक करून ते चालतात की नाही याची खातरदारी केली पाहिजे. कमी आवाज करणार्‍या यंत्राचा व शांतता राखणार्‍या साधंनांचा वापर करावा, मोठा आवाज निर्माण करणारी साधने कमी वापरावी.
2) कायद्याची कडक अमलबजावणी : ध्वणीप्रदूषण करणार्‍यानवर व ध्वणीप्रदूषनाला मदत करणार्‍यांवर कायदेशीर कडक कारवाई करावी. त्यासाठी लोकांनी सामाजिक दृष्ट्या सहकार्य करावे. केंद्र व राज्य सरकारांनी कायद्याची कडक अमलबजावणी करावी. भारतात एअर पोल्युशन अक्ट १९८१, ध्वणीप्रदूषण नियमन व नियंत्रण नियम २००० इत्यादि कायदे उपयुक्त आहेत. ध्वनिप्रदूषनाची कारणे
3) जनजागृती : ध्वणीप्रदूषनामुळे कोणते दुष्परिणाम होतात. त्याची माहिती वृत्तपत्रे, दूरदर्शन, आकाशवाणी इ. प्रसारमाध्यमातून समाजाला करौन द्यावी. आवाजावर नियंत्रण ठेऊन सौम्य आवाजाचा उपयोग करावा. याची माहिती समजापर्यंत पोहचाववी. मानसिक शारीरिक आजार, बहिरेपणा, चिडचिड, तापटपणा, अस्वस्थता इ. विकारांची माहिती द्यावी. व शांततेचे महत्व पटउण द्यावे. तसेच ध्वणीप्रदूषनापासून वाचण्यासाठी कानात इयर प्लग वापरावेत, तसेच कानात कापसाचे बोळे घालावे.

फोटो छायांकन- इंटरनेट 
सादरकर्ता - विकास अशोक दौंड 
एम.जे.एम.सी. प्रथम वर्ष 
के.टी.एच.एम. कॉलेज 


Wednesday, March 16, 2016

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे


वृक्ष लावा, वृक्ष जगवा-
जगातील लोकांमधे वने आणि वनापासून मानवाला मिळणारे विविध फायदे याबाबत जागृती येण्यासाठी दरवर्षी २१ मार्च हा दिवस जागतिक वनदिन म्हणून साजरा केला जातो. युरोपियन कृषी परिषदेच्या २३ व्या आमसभेत सन १९७१ साली या संकल्पनेचा उदय झाला. केवळ वृक्षसंपदा असाच वनाचा अर्थ न घेता वृक्षामुळे वातावरणाचे संरक्षण होते ते केले जावे, अशी अपेक्षा आहे. वृक्षांच्या आणि प्राण्यांच्या अनेक प्रजाती वनात वास्तव्यास असतात. विविध कृमी, कीटक, जीवाणूंचे वास्तव्य वनातील मातीत असते. पोषणदृष्ट्या ही माती पौष्टिक मानली जाते म्हणूनच दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड चिंतेचा विषय आहे. वृक्षतोड करून मानवाच्या वसाहती निर्माण करण्यासाठी वनांचा मोठ्या प्रमाणावर र्हास होत आहे. म्हणूनच वन संरक्षणाकरता प्रत्येकाने वैयक्तीकरीत्या भाग घेण्याची गरज आहे. वनसंरक्षण खात्याच्या नियमाप्रमाणे प्रत्येकी एक वृक्षाची तोड केल्यास त्या जागी १० झाडांची लागवड केली पाहिजे. दिवसेंदिवस होणार्‍या जंगल कटाईमुळे मातीची धूप, वृक्षांची कमतरता, पावसाचे कमी होत जाणारे प्रमाण, वृक्षाअभावी येणारे पूर अशा समस्या जगात जागोजागी भेडसावत आहेत. सन १९५२ साली भारताने आपले वनविषयक धोरण जाहीर केले. शास्त्रीयदृष्ट्या ३३ टक्के जमीन वनाखाली असणे आवश्यक आहे, याची जाणीव ठेवून भारत सरकारने ‘वन महोत्सव’ सुरू केला. पण याबाबत पाहिजे तेवढी जनजागृती अजूनही झाली नाही, असेच म्हणावे लागेल.
पूर्वीच्या काळी आदिवासी बांधव निसर्गालाच देव मानत असत, त्याचे संवर्धन जतन करणारा समाज हा नांगरणी न करताही पीक काढत असे. तो वनातील झाडांची फांदी कधीही तोडत नसे. कारण झाडांनाही जीव असतो हे तो जाणत होता. तो जंगलाचा मित्र होता. त्याला जंगलची भाषा समजत होती. पण तो कधीही जमीनदार झाला नाही. आज शासन वन आणि वनवासीसाठी विविध योजना राबवत आहे. जंगल तुमचे, ती वाढवण्याची जबाबदारी तुमची आणि त्यातून मिळणारी संपत्तीही तुमचीच. जंगलाला आणि शेजारच्या आदिवासींना जगवणारी योजना राज्य शासनाने हाती घेतली आहे. महाराष्ट्र राज्याच्या वन विषयक धोरणाचा अभ्यास केला तर असे समजले की महाराष्ट्रात वनाखालील क्षेत्र २०.१० टक्के आहे. वनस्पतीमध्ये झाडेझुडपे, वेली, गवत इत्यादींचा समावेश होतो. या वनस्पतीची वाढ हवामान, पाऊस, जमिनीचा उंच-सखलपणा या भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते. महाराष्ट्र राज्यात भौगोलिक परिस्थितीत भिन्नता आढळते, म्हणूनच वनस्पतीत सुद्धा भिन्नता आहे. सदाहरित वने, पानझडी वने आणि काटेरी झुडपांचे वने असे वनांचे तीन प्रकार महाराष्ट्रात दिसून येतात.सदाहरित वनांची झाडे हिरवीगार दिसतात. आपल्या सह्याद्रीचा उंच भाग आणि पश्‍चिम उतार तसेच दक्षिण कोकण भाग या जास्त पावसाच्या प्रदेशात ही वने आहेत. पानझडी वनातील झाडांची पाने उन्हाळ्याच्या सुरवातीलाच गळतात, पावसाळ्यापूर्वी येथील झाडांना पालवी फुटते. महाराष्ट्र राज्यात सह्याद्रीचा पूर्व उतार मेळघाट व सातपुडा सातमाळा व अजिंठा या मध्यम पावसाच्या भागात ही वने आढळतात. काटेरी झुडपांच्या वनात कमी उंचीची झाडेझुडपे आढळतात, नापीक जमीन व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात काटेरी झुडपे आढळतात. मध्य महाराष्ट्रात पठारी भागात ही वने आहेत.
महाराष्ट्रात याशिवाय किनारपट्टीच्या खार्‍या जमिनीत विशिष्ट पाणथळ वनस्पती आढळतात. डोंगर उतारावर व माळरानात गवत उगवते. हवेतील गारवा टिकवण्यासाठी, हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी औषधी वनस्पतीची उपलब्धता, फर्निचर व शेतीच्या अवजारासाठी लाकूड मिळवणे फळे-भाज्या-मध इत्यादी खाद्यपदार्थाची उपलब्धता इ.प्रकारे वनांचा उपयोग केला जातो. या वनाचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरण विभागाची निर्मिती केली आहे. या विभागातर्फे रस्ते, लोहमार्ग, कालवे, शिक्षणसंस्था शासकीय कार्यालये इ. ठिकाणी वृक्ष लागवड केली जाते.
जागतिक वनदिनानिमित्त प्रत्येकाने किमान एक झाड लावून वनदिन साजरा करावा असा आदेश महाराष्ट्र सरकारने दिला.आणि तो आपण सर्वांनी अमलात आणला पाहिजे. दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड हा चिंतेचा विषय आहे. वनखात्याच्या नियमाप्रमाणे १ झाड तोडल्यास १० झाडे लावण्याची गरज आहे. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण टिकवण्यासाठी, गारवा टिकवण्यासाठी औषधी वनस्पतीची उपलब्धता, शेतीची अवजारे इ. साठी वनांची आवश्यकता आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरणाची निर्मिती केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शासनाने विविध वन रक्षकांची नेमणूक करून पर्यावरणाचे सरक्षण करण्यास सुरुवात केली आहे. त्याच प्रमाणे शासनाने ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशा प्रकारचे विविध उपक्रम चालू केले. व त्याच प्रमाणे त्यातून रोजगारही उपलब्ध करून दिला. जागतिक वनदिनानिमित्त प्रत्येकाने किमान एक झाड लावून वनदिन साजरा करावा असा आदेश महाराष्ट्र सरकारने दिला.आणि तो आपण सर्वांनी अमलात आणला पाहिजे. दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड हा चिंतेचा विषय आहे. वनखात्याच्या नियमाप्रमाणे १ झाड तोडल्यास १० झाडे लावण्याची गरज आहे.

फोटो छायांकन- इंटरनेट
सादरकर्ता- विकास अशोक दौंड
एम.जे.एम.सी. प्रथम वर्ष
के.टी.एच.एम. कॉलेज

पर्यावरण प्रदूषण

पर्यावरणीय प्रदूषणासाठी हानिकारक घटक-
मानव व त्याच्या सभोवताली असणारे पर्यावरण यांचा अतिशय घनिष्टसंबंध आहे.पृथ्वीवरील सजीव सृष्टी निकोप राहण्यासाठी स्वछव सुंदर पर्यावरणाची अवशकता असते. पर्यावरण शुद्ध ठेवण्यासाठी मानव व पर्यावरण यांचे संतुलन कायम ठेवणे आवश्यक असते. मानवाच्या बहुतांश गरजा पर्यावरनातूनच भागविल्या जातात. मागील शतकांपासून प्रचंड प्रमाणात वाढलेली लोकसंख्या व औद्योगिकीकरणामुळे पर्यावरण व मानव यांतील समतोल केव्हा व कसा ढासळला हे मानवाच्या लक्षात आले नाही. अति लोभा पायी मानवाने मोठ्या प्रमाणात पर्यावरण अशुद्ध केले. वाढत्या लोकसंख्येचे पालनपोषण करण्यासाठी मानवाने अविचारणे नैसर्गिक साधनसंपतीचा वापर करून निसर्गाचा पर्यायाने नाश केला. पर्यावरणाचे संतुलन बिघडले. पर्यावरणाच्या अनुषंगाने ज्या परिसंस्था निर्माण झाल्या, विकसित झाल्या त्यांचेही संतुलन बिघडले. अनेक प्रकारे पर्यावरण दूषित केले. ज्या घटकाद्वारे पर्यावरण दूषित केले जाते. त्यांना दूषितके म्हणतात. दूषितकांद्वारा जेव्हा पर्यावरण दूषित होऊन मानव व पर्यावरणाचा टोल ढासळतो तेव्हा त्या प्रक्रियेस प्रदूषण असे म्हणतात.
पृथ्वीच्या पृष्टभागातील जीवसृष्टी ज्या विशिष्ट परिस्थितीत जगते त्या पार्श्वभूमीला पर्यावरण असे म्हणतात. मानवाच्या सभोवताली निसर्गातील विविध घटकांची मिळून पर्यावरण निर्माण झालेले असते. हे पर्यावरण मानव,प्राणी,वनस्पति यासारख्या सजीवांना जगण्यासाठी उपयोगी पडते. परंतु जर पर्यावरणात मानवासह सर्व सजीवांना हानिकारक किव्हा प्रतिकूल ठरणार्‍या घटकांच्या प्रवेश झाला तर ते पर्यावरण मानवासह सर्व सजीवांना घातक ठरते. यालाच प्रदूषण म्हणतात. 
प्रदूषणाचा अर्थ-
प्रदूषण या शब्दाचा अर्थ केवळ एक दोन वाक्यात सांगता येणार नाही. सर्वसामान्यपणे असे सांगता येईल की, पर्यावरणात निर्माण होणार्‍या किव्हा केल्या जाणार्‍या अपायकारक पदार्थांना दूषितके असे म्हणतात. दूषितकांमुळे पर्यावरण दूषित होणार्‍या क्रियेला प्रदूषण असे म्हणतात. 

व्याख्या :
१)वातावरणातील धूळ, वायू, धूर, बाष्प,धुके,त्याज्य पदार्थ इत्यादि घटक किव्हा समुहांमुळे वनस्पति व प्राणी जीवनास अपायकारक ठरलेले पर्यावरण म्हणजे प्रदूषण होय.
२) मानवी क्रियांमुळे आपल्या भोवतालच्या परिस्थितीत पुर्णपणे किव्हा काही प्रमाणात झालेला फेराफार म्हणजे प्रदूषण होय.
प्रदूषणाच्या वरील व्याख्येवरून असे स्पष्ट होते की पर्यावरणातील अपायकारक घटकांमुळे पारयावरणाचे संतुलन बिघडते. म्हणून अशा दूषित झालेल्या पर्यावरणास प्रदुषण असे म्हणता येईल.
प्रदूषणाचे प्रकार-
पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पति,मानव व इतर प्राणी ज्या पर्यावरणात किव्हा परिसरात राहतात त्या पर्यावरणात विविध घटकांत संतुलन झालेले असते. सजीवांच्या एका जातीने त्याज्य केलेली वस्तु दुसर्‍या` एखाद्या जातीला पोषनासाठी इष्ट असू शकतात. अशा परस्परावलंबनामुळे पर्यावरणाची संरचना टिकून राहते. तथापि सध्याच्या अनिर्बंध मानवी संस्कृतीमुळे पृथ्वीच्या पर्यावरणातील नेहमीच्या घटका व्यतिरिक्त इतर अपाय कारक घटक हे मोठ्या पप्रमाणावर पर्यावरण सोडले जाते. असे विविध घटक पर्यावरणात जसेच्या तसे सोडून दिल्यामुळे पर्यावरणाच्या विविध घटकातील संतुलन बिघडते व त्यामुळे पृथ्वीवरील वनस्पति व प्राणी यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. अशा विविध क्रिया प्रक्रियांमुळे प्रदूषण घडू शकते. लोकसंख्या वाढ, वाहतूक व इंधन इ. जंगलतोड, खानकाम, रासायनिक खते व जंतूंनाशकांचा वापर इ. विविध कारणांमुळे प्रदूषण घडून येते. याशिवाय प्रदूषण मुख्यते नैसर्गिक व सांस्कृतिक खटकांमुळे होतो. यावरून नैसर्गिक व सांस्कृतिक प्रदूषण असेही दोन प्रकार पडतात. उदा.ज्वालामुखीमुळे होणारे प्रदूषण हे नैसर्गिक प्रदूषण आहे. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या कारणांनी प्रदूषण हे होत असते. 

फोटो छायांकन - इंटरनेट
सादरकर्ता- विकास अशोक दौंड 
एम.जे.एम.सी.प्रथम वर्ष
के.टी.एच.एम कॉलेज, नाशिक

महाराष्ट्रातील धबधबे

महाराष्ट्रातील धबधबे आणि पिकनिक स्पॉट-

पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे रिमझिम बरसलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मान्सून पिकनिकची तयारी सुपरफास्ट ट्रॅकवर आहे.कैक फुटांच्या उंचीवरून येणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते. लोणावळा, खंडाळा, माळशेज घाट यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणांबरोबरचं जवळपासचे धबधबे शोधण्याची जोरदार धावपळ सुरू झालीये अशा दोन्ही ठिकाणचा आनंद घेता येतो.रांधा फॉल - सह्याद्रीच्या पर्वतरांगात विल्सन डॅमपासून तयार झालेला हा धबधबा. या ठिकाणी जाण्यासाठी गाडी हा एकमेव पर्याय आहे. इगतपुरी जवळ असलेल्या विल्सन डॅम जवळ हा धबधबा आहे.
पांडवकडा -
खारघर परिसरात पांडवकडा हा धबधबा गेल्या दहा वर्षात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांच्या लीस्टमध्ये अग्रभागी आहे. याधबधब्यावर जाण्यास बंदी घातली असली तरी अनेक पर्यटक पांडवकड्याला भेट देतात. आजूबाजूच्या डोंगराने नेसलेला हिरवाकंच शालू पर्यटकांना भुरळ घालत असतो. हार्बर रेल्वे मार्गावरील खारघर स्टेशनवरून या ठिकाणी जाता येते.
झेनिथ
खोपोली शहरापासून २ किमीवर असलेल्या झेनिथ धबधब्याच्या पाण्याचा फोर्स खूप आहे, पण तरीही तरुणाईला पिकनिकसाठी झेनिथला जाण्याचा मोह काही आवरत नाही.म्हणूनच शनिवारी-रविवारी या धबधब्यावर मोठी गर्दी होत असते. इथल्या प्रत्येक कोपर्‍यावर पंजाबी धाबे आहेत.
पळसदरी - मुंबई-पुणे महामार्गावरच्या चौक फाट्यापासून १८ किमी दूर आणि पळसदरी रेल्वे स्टेशनपासून दोन किमी अंतरावर पळसदरी धबधबा आहे. रेल्वेमार्गाचा पर्याय असल्याने या ठिकाणी गर्दीचे प्रमाण जास्त असते.
गाढेश्वर -
पनवेल तालुक्यात पावसाळी गर्दी गाढेश्वर नदीकाठी पाहायला मिळते. मनसोक्त डुंबण्यासाठी इच्छुक असणारे पर्यटक या ठिकाणी आवर्जून येतात. 
फणसाड धबधबा -
फणसाड अभयारण्यामधील या धबधब्यात चिंब होणं म्हणजे एक रोमहर्षक अनुभव आहे. या धबधब्यात सचैल स्नानानंतर अभयारण्यात पक्ष्यांचा किलबिलाट आणि झाडांची हिरवाई पाहण्यात एक वेगळा आनंद आहे.
सवतकडा

मुरुड-जंजिरापासून ११ किमी अंतरावरील सवतकडा धबधबा पर्यटकांनी शोधून काढला आहे. मुरुड-आगरदांडा रस्त्यावरील शिघ्रे गावातून सवतकड्याची पाऊलवाट जाते. या पाऊलवाटेवरून जाण्याचा थरार अविस्मरणीय आहे. 
गवळीदेव -
नवी मुंबईतील घणसोली गावाजवळ असणारा गवळीदेव धबधबाही आसपासच्या पर्यटकांना खुणावत आहे. शहराच्या इतक्या जवळ असूनही हा धबधबा आणि गवळीदेव डोंगर अनेक मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. 
कोंडेश्वर -
बदलापूरपासून सहा किलोमीटर अंतरावर कोंडेश्वरचा धबधबा आहे. इथे दोन धबधबे आहेत. बदलापूर पूर्वेकडून भोज-दहिवली शेअर रिक्षा उपलब्ध आहेत. कुंडात डोह असून त्यात कपार्या असल्याने येथे पाण्यात उतरताना पुरेशी खबरदारी घ्यावी लागते.
भगीरथ -
वांगणीपासून चार किलोमीटर अंतरावर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरलेला भगीरथ धबधबा आहे. बेडीसगावा पासून धबधब्याकडे जाण्यासाठी पायवाट आहे. 
टपालवाडी
नेरळ रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावर असणार्या आनंदवाडी आदिवासी वाडीजवळ यथेच्छ पोहण्यासाठी छान डोह असणारा एक धबधबा आहे. अलीकडच्या काळात पर्यटकांपैकीच कुणीतरी ‘टपालवाडीचा धबधबा’असे त्याचे नाव ठेवले आहे. ठिकाण अतिशय निसर्ग रम्य आहे. 
आषाणे
भिवपुरी-कर्जतदरम्यान भिवपुरीपासून पाच किमीवर असणार्या आषाणे गावाजवळील धबधबा हेही पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. इथे जाण्यासाठी भिवपुरी पासून रिक्षा मिळते.
थिदबीचा धबधबा-
पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. कल्याण-माळशेज रस्त्यावर घाटाच्या पायथ्याशी साबर्णे गावापासून पुढे थिदबी गावापर्यंत ३ कि.मी. कच्च्या रस्त्याने चालत जावे लागेल. तेव्हा तो धबधबा दिसतो. 
निवळी
निवळी घाट चढताना पर्यटकांना आकर्षित करतो तो हिरव्या दाट झाडीतून कोसळणारा धबधबा. निवळी धबधब्याचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी घाटातच पर्यटकांसाठी खास पॉइंट तयार करण्यात आला आहे. ज्या पर्यटकांना प्रत्यक्ष धबधब्याजवळ जायचे असेल त्यांच्यासाठी पायर्‍यांचा मार्ग तयार करण्यात आला आहे. 
नाशिक
नाशिकच्या पुढेच असणार्‍या चाळीसगावाजवळील पावणादेवी आणि त्या परिसरातील जंगल हे पावसाळ्यात पर्यटनाचे आणखी काही पर्याय ठरू शकतात. इथे असलेला कण्हेरगड किल्ला आणि केदारेश्वर धबधबा पाहण्यासारखा आहे.
रायगड
रायगड जिल्ह्यात खोपोली पाली रस्त्यालगत दुरशेत गावाआधी उंबरखिंड हे स्थान आहे. खंडाळ्याच्या डोंगरातून पडणारे पाणी उंबरखिंडीत येते आणि नदीमार्गे कोकणात जाते.दुरशेतहून पुढे जांभूळ पाड्यामार्गे भेली व गावालगतचा मृगगड हा किल्ला आणि त्याकडे जाणारा नदीलगतचा मार्गही पर्यटकांना भुरळ पाडतो. गणपतीच्या पाली गावाआधी ठाणाळे हा लेणी समूह आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पावसाळ्यात आपले विलोभनीय रूप दाखवतो. पाली गावालगतच सरसगड हा किल्ला आहे, आणि तेथून पुढे असणारा सुधागड किल्ल्याला देखील पावसाळ्यात भेट देणं भारी वाटत.

फोटो छायांकन- इंटरनेट 
सादरकर्ता- विकास अशोक दौंड
एम.जे.एम.सी.प्रथम वर्ष
के.टी.एच.एम कॉलेज, नाशिक

महाराष्ट्रातील अभयारण्ये


ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर-


ताडोबा येथील दाट जंगल १९५५ मध्ये संरक्षित अभयारण्य म्हणून घोषित केले गेले आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या पश्र्चिम भागात ते आहे. नागपूरपासून १५४ कि. मी. अंतरावर असलेल्या ताडोबाच्या जंगलात अगदी मध्यभागी ताडोरा नावाचा तलाव आहे. साग, मोह, निलगिरी अशी झाडे या सुमारे ११६ चौ. कि.मी. क्षेत्रावर पसरलेल्या जंगलात आहेत. तर वाघ, लांडगे, कोल्हे, रानकुत्रे, रान मांजरे, अस्वल, चारसिंगा, रान डुक्कर, चिंकारा, चितळ, सांबर हे प्राणी आणि अनेक सरपटणारे प्राणीही या जंगलात आढळतात. येथे सुमारे २५० प्रकारचे पक्षीही आढळतात. येथील ‘मगर पालन’ केंद्र हे आशिया खंडातील उल्लेखनीय केंद्र आहे. सुंदर झोपडीतील वन्यप्राणी संग्रहालय, तेथील प्राण्यांचे सांगाडे, पक्षांची घरटी हे सुद्धा पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.
ताडोबा राष्ट्रीय उद्यान व जोडूनच असलेले अंधारी वन्यजीव अभयारण्य या दोन्ही प्रकल्पांना एकत्रितपणे ताडोबा-अंधारी व्याघ‘ प्रकल्प असे म्हटले जाते. स्थानिक आदिवासी देव तारू किंवा तारोबा यावरून ताडोबा हे नाव रूढ झाले, अन्‌ जंगलातून अंधारी नदी वाहते त्यावरून अभयारण्यास नाव देण्यात आले. या राष्ट्रीय उद्यानास ‘विदर्भाचे रत्न’ असे म्हटले जाते.

संजय गांधी राष्ट्रिय उद्यान बोरीवली मुंबई-

मुंबई उपनगर जिल्ह्यात बोरिवली येथील परिसरात - मुंबई व ठाणे शहरांसाठी जणू फुफुसांचे काम करणारे - हे राष्ट्रीय उद्यान / अभयारण्य आहे. या भागाला कृष्णगिरी उद्यान असेही म्हटले जाते. १९७४ मध्ये हे ‘अभयारण्य’ घोषित करण्यात आले. येथील दाट जंगलात कान्हेरी गुंफामध्ये बौद्ध लेणी कोरलेली आढळतात. जंगलची सफर घडवणारी रेल्वे येथे असून त्यातून आपण वनजीवनाचा आनंद घेऊ शकतो. सुमारे १०४ चौ. कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या अभयारण्यात चितळ, भेकर, सांबर हे प्राणी आढळतात, तसेच सुमारे २५० जातींचे पक्षीही येथे आढळतात. मुंबईपासून जवळ असल्यामुळे या अभयारण्यात पर्यटकांची कायम गर्दी असते.
नवेगाव राष्ट्रीय उद्यान, गोंदिया – 

२२ नोव्हेंबर, १९७५ या दिवशी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले हे घनदाट जंगल महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेला आहे. नवेगाव तलावाभोवती लहान टेकड्यानी हे राष्ट्रीय उद्यान वेढलेले आहे. वाघ, बिबळ्या, सांबर, हरीण, चितळ, नीलगाय, अस्वल असे प्राणी येथील जंगलात दिसतात. तर पक्षीही भरपूर दिसतात. तलावामुळे पाण्याजवळ असणारे निरनिराळे पक्षी नेहमी येतात. येथील पक्षी अभयारण्यास डॉ. सलीम अली पक्षी अभरायण्य असे म्हटले जाते. राज्यातील एकूण पक्षांच्या प्रजातींपैकी सुमारे ६०% प्रजाती आपणास येथे पाहण्यास मिळू शकतात. हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यात असून सुमारे १४० चौ. कि. मी. परिसरात पसरलेले आहे. खुद्द नवेगाव बांध हा जिल्ह्यातील सर्वांत मोठा तलाव असून त्याचे क्षेत्र सुमारे ११ चौ. कि. मी. आहे. या तलावाच्या मध्यभागी प्रेक्षणीय असे ‘मालडोंगरी’ बेट आहे.

नागझिरा अभयारण्य ,गोंदिया– 

१९७०-७१ मध्ये घोषित केलेले हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्याच्या परिसरात आहे. मोठे वृक्ष, वेली, वनौषधी या जंगलात सापडतात. वाघ, लांडगा, रानमांजर, उदमांजर, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, बिबळ्या, चिंकारा, रानकुत्रे तरस असे एकूण ३५ प्रजातींचे प्राणी या जंगलात आहेत. तसेच येथे सरपटणारे प्राणी (३४ प्रजाती) आणि विविध पक्षीही (१६६ प्रजाती) आढळतात. साग, साल, आवळा, बाभूळ, तेंदू, सालई. खैर, आंबा, बांबू, बेहडा, धावडा, मोह, हिवर, उंबर, कुसुंब असे महाराष्ट्रातील महत्त्वाचे सर्व वृक्ष या जंगलात बघायला मिळतात. पर्यावरणविषयक जागृती करणारे वस्तु संग्रहालय देखील येथे पाहण्यास मिळते. तसेच वन्यजीवांचे अवशेष व संबंधित माहिती पटही आपण येथे पाहू शकतो. विदर्भातील हे एक लक्षणीय पर्यटन स्थळ असून याच जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान येथून जवळच आहे.
यावल अभयारण्य, जळगाव-
मार्च, १९६९ मध्ये हे संरक्षित जंगल म्हणून घोषित झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल रावेरजवळचे हे जंगल मध्य प्रदेशच्या सीमेजवळ आहे. दाट वाढलेले बांबू, तसेच ऐन, बेल, बाभूळ, आवळा, जांभूळ, साग, तिवस, खैर, चारोळी, जांभूळ, तेंदू, धावडा, शिसम, पळस अशी वनसंपदा या जंगलात आहे. वाघ, लांडगा, कोल्हा, रानडुक्कर, शेकरू, सांबर, नीलगाय, रानमांजर, हरीण व मोर हे प्राणी-पक्षी येथे आढळतात. सातपुड्याची उत्तरेकडील रांग व अनेर नदीचे खोरे - यांच्या परिसरात हे जंगल पसरलेले आहे. सुखी किंवा सुकी नावाची नदीही या अभयारण्यातून वाहते. या परिसरात तडवी व पावरा जमातीचे अदिवासी राहतात. यावल तालुक्यातील या अभयारण्याचे क्षेत्रफळ सुमारे १७७ चौ. कि. मी. आहे. येथून जवळच पाल हे सातपुड्याच्या रांगेतील थंड हवेचे ठिकाण आहे.
राधानगरी अभयारण्य, कोल्हापूर-

डिसेंबर, १९५८ मध्ये जंगली जनावरांची हत्या थांबावी या दृष्टीने हे राधानगरीचे जंगल अभयारण्य म्हणून घोषित केले. कोल्हापूर जिल्ह्यात असलेले महाराष्ट्र राज्यातील अगदी सुरुवातीच्या काळात घोषित झालेले हे अभयारण्य आहे. राजर्षी शाहू सागर, लक्ष्मी सागर हे मोठे जलाशय, पश्चिम घाटातील सह्याद्रीची रांग यांच्या सान्निध्यात असलेले हे अभयारण्य अनेक नद्यांनी वेढलेले आहे. भोगावती, दूधगंगा, तुळशी, कळमा, दिर्बा या नद्या अभयारण्यातूनच वाहतात. नंतर कृष्णेला हे सर्व प्रवाह मिळतात. अंजन, जांभूळ, हिरडा, आवळा,
पिसा, ऐन, किंजळ, आंबा, कुंभ, कटक, उंबर, गेळा, बिब्बा असे वृक्ष या जंगलात आहेत. बिबळ्या, अस्वल, रानडुक्कर, चितळ, सांबर, मोठी खार, जंगली कुत्रे, हरीण असे प्राणी बघायला या जंगलात जंगलप्रेमी गर्दी करतात. हे अभयारण्य खास गव्यांसाठी संरक्षित व प्रसिद्ध आहे. कारवी, शिकेकाई, गारंबी, धायटी, मुरुडशेंग, करवंद, बेगाटी, रानमिरी, नरक्या अशा काही वेली, झुडूपांसह औषधी वनस्पतींची या जंगलात भरपूर गर्दी आहे. भोगावती नदीवरील राधानगरी धरणाच्या परिसरातील या जंगलास दाजीपूर अभयारण्य असे म्हटले जाते. कोल्हापूरपासून सुमारे ५५ कि.मी. अंतरावर असलेल्या अभयारण्याचे क्षेत्रफळ सुमारे ३५१ चौ. कि.मी. आहे.

फोटो छायांकन- इंटरनेट 

सादरकर्ता -विकास अशोक दौंड
एम.जे. एमसी. प्रथम वर्ष
के.टी.एच.एम.कॉलेज


निसर्गा विषयी थोडेसे...

निसर्ग ऋण
निसर्ग मला सतत साद घालत असतो, ध्यानी - मनी - स्वप्नी तोच मला दिसत असतो. जळी - स्थळी - काष्ठी - पाषाणी सर्वत्र चराचरात 

व्यापून राहिलेला निसर्ग हा माला खुणावत असतो.  त्याने जणू काही वेडंच केल आहे. आणि का नाही करणार वेडं ? कारण निसर्ग आहेच तसा किमयागार, शेकडो जादू पोतडीत असणारा अवलीया जादूगार, ज्याला फक्त देणंच माहीती आहे. काय काय दिपवून टाकणारे चमत्कार तो करत असतो.  ते पाहून आपले मनअचंबित होत असतं  एखादी नवलाइची गोष्ट निसर्गात घडली की  आपण म्हणतो नैसर्गिक चमत्कार आहे हा जणू, रोजचा निसर्ग नवीन असतो, शीळेपणा त्याला मंजूरच नाही.  आणि परिवर्तन हाच जगाचा नियम आहे, हेच तो त्यातून सांगत असतो. नित्यनूतन चैतन्याने जगत राहा हेच तो त्यातून सुचवत असतोअगणित रंगांची उधळण करावी ती त्यानेच, सुवासाने जगाला भारून टाकायचे कामही त्याचेच, थकलेल्या, शिणलेल्या, चिंतेने ग्रासलेल्या तणावाखालील मनाला, त्याची ताजी टवटवीत हिरवाई प्रसन्न करून उभारी देते ती वेगळीच असते.  त्याच्या गूढ निळाईत मनाची बासरी वाजू लागते. सकाळी केशराचा सडा टाकून नव्या दिवसाचे स्वागतही तोच  करतो. तर दिवसभर काम करण्याची उर्जा तोच पुरवत असतो. अन रात्रीच्या वेळेस दमलेल्या - भागलेल्या जीवांवर  चांदण्यांची दुलई पांघरून तोच जोजवत असतो. पण आताशा काय झालय की निसर्गाचं लाडकं लेकरू असणारा माणूसच निसर्गाशी फटकून राहू लागला आहे.  आणि वागू लागला आहे. आपल्याच जन्मदात्या आईवडिलांना व्रुद्धाश्रमात पाठविणार्‍य कृतघ्नांसारखा ध्रुतराष्ट्राप्रमाणे स्वार्थलोलुपतेची पट्टीच माणसाने डोळ्यांवर बांधूनघेतलीय.  त्याला हेही कळत नाहीये की, निसर्ग जगला तरच आपण जगू शकू म्हणून जगा आणि जगू द्या हा मंत्रच तो विसरला आहे. जगण्यातली सगळी गंमतच तो हरवून बसला आहे. सगळ्या निसर्गाला वेठीस धरून निसर्गाचं शोषण करणारा माणूस खरोखरंच एवढा उपद्रवी झालाय का ? त्याला हेही कळत नाहीये का ? की निसर्गाचा विनाश म्हणजेच आपला विनाश आहे बरं का तरी  स्वतःच्याच पायावर का कुर्‍हाड मारून घेतोय? स्वतःच्याच अस्तित्वाला चूड लावून का घेतो?  कुठे गेली ती हिरवीगार वनराजी अन समुद्राचे निळेशार पाणी ? कुठे गेले ते बागडणारे लहान - मोठे प्राणी ? कुठे हरवली पक्ष्यांची ती मंजुळ मंजुळ गाणी ? केले डोंगर उघडे - बोडके अन जलाशय प्रदूषित. अतिलोभाने माणसाचे मनही झालं आहे कलुषित,  ऋतुंनी आपले स्वाभाव बदलले, रोगराईला आमंत्रण मिळाले. आता माणसा भोग आपुल्या विपरीत करणीची फळे.  त्यामुळे दुःखात आपुल्या माणसाने अजुनच जणू घातली भर . निसर्गाकडे पाठ फिरविता संकटे येऊ लागले आपोआप. म्हणून  'चला परत निसर्गाकडे' गाणे आनंदाचे गायला बापुड्वाणा झाला माणूस, करावे तरी आता काय? असा प्रश्न आता माणसाला पडू लागला.  हे निसर्गा, माणूस जरी उतला - मातला असला तरी तू त्याला उदार मनाने क्षमा कर कारण 'कळतय पणवळत नाही' अशा स्थितीत माणूस उभा आहे, या धोक्याच्या वळणावर आणि हे सर्व पाहून संवेदनशील मनांचा नक्कीच उडतोय त्याचा थरकाप, कारण त्यांना माहीत आहे की, माणसाने कितीही केल्या जरी गमजा तरी निसर्गच आहे सर्वांचा बाप, निसर्गापुढे काय चालणार कुणाची टाप, निसर्गाने डोळे वटारले तर माणसाची काय आहे बिशा  तेव्हा माणसाने वेळीच आवरलेला बरा स्वतःचा उन्माद. पृथ्वी तरी कुठे ठेवली आहे माणसाने राहण्यालायक ? पण माणसाने हेही जाणलेले बरे की निसर्गच आहे पृथ्वीचा पालनकर्ता परमेश्वर अन महानायक परिस्थिती हाताबाहेर गेली असली तरिही कुठेतरी दिसतोय आशेचा किरण काही निसर्गवेडे निसर्ग संवर्धन करून अंशतः का होईना फेडण्याचा प्रयत्न करताहेत निसर्गाचे ऋण म्हणून हे निसर्गा आम्ही तुला वचन देतो की, प्रयत्नांची पराकाष्ठा करून आम्ही तुला तुझे नुकसान भरून देउ  सुजलाम - सुफलाम वसुंधरा पुढील पिढीच्या हाती नक्कीच देउ, सुजलाम - सुफलाम वसुंधरा पुढील पिढीच्या हाती नक्कीच देउ. निसर्ग देतो आहे हाळी, प्रतिसाद त्याला देउ या चला लवकर, ताबडतोब वात निसर्गाची धरू या करण्या पृथ्वीचे नंदनवन. हे निसर्गा तुझ्यापुढे माणसाने आपले मस्तक ठेवले आहे त्यामुळे तू त्याच्यावर दया दाखून त्याला माफ करवे. आणि असाच मानवाच्या जीवनात बहरत रहा. 

फोटो छायांकन -इंटरनेट 
सादरकर्ता - विकास अशोक दौंड 
एम.जे.एम.सी. प्रथम वर्ष 
के.टी.एच.एम.कॉलेज