ध्वनि प्रदूषणाचे परिणाम
ध्वनि म्हणजे आवाज होय. जे ध्वनि ऐकून आपल्याला त्रास होतो, त्याला गोंगाट म्हणतात. ते आवाज किंवा ते ध्वनि आपणास ऐकायला नकोसे वाटतात, अस्वस्थ वाटते. कंठाळ्या बसतात. अशा कर्कश आवाजापासून
ध्वनिप्रदूषण होते. सहन न होणारा कर्कश, गोंगाट, मोठा आवाज हा यातनादायक, मानसिक शांतता व एकाग्रता नष्ट करणारा,, रक्तदाब वाढतो, हृदयाचे ठोके वाढतात. चिडचिडेपणा वाढतो. अशा संतापजनक आवाजाला ‘ध्वनिप्रदूषण’ म्हणतात. जे ध्वनि ऐकायला मधुर,गोड वाटतात, अशा शांत ध्वनिमुळे मनाची एकाग्रता व प्रसन्नता वाढते. मधुर संगीतश्रवनामुळे गाई जास्त दूध देतात. पक्षी,प्राणी यांची उत्पादन क्षमता वाढते. श्रम करण्यास हुरूप येतो. कुक्कुटपालन केंद्रामध्ये मधुर ध्वनि श्रवणामुळे कोंबड्यांच्या अंड्यांचे उत्पादन वाढल्याचे प्रयोगात आढळून आले आहे. मधुर ध्वणींमुळे वनस्पतींची व पिकांची वाद चांगली होते. डॉल्फिन या सागरी माशांना संगीत आवडते. गुरांना पाणी पाजताना शीळ घालतात. गुरांची तहान समाधानाने शांत होतात. मधुर ध्वनि ऐकल्याने अभ्यास चांगला होतो. नेहमी हळू व सौम्य बोलावे. मोठयाने बोलू नये. कर्कश मोठा नकोसा वाटणारा आवाज ऐकणार्याला बहिरे व तापट बनवतो. एखादे गाणे ऐकणार्याला संगीत म्हणून आवडेल, तर तेच गाणे दुसर्याला गोंगाटाचे वाटू शकेल. गोंगाटमुळे लक्ष विचलित होते. एकाग्रता नष्ट होते व त्यामुळे कार्याला अडथळा निर्माण होतो. त्रासदायक आवाज म्हणजे ध्वणीप्रदूषण होय. आपल्याकडे अनेक मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात मोठमोठ्या आवाजाचे ‘ध्वनीक्षेपक’ (लाउडस्पीकर) वापरतात. कंठाळ्या बसविणारे फटाके वाजवितात. त्याने मानसिक तान आणि अस्वस्थता वाढते. म्हणून मोठा आवाज ऐकण्यास घातक असतो. तर लहान आवाज मंजुळ स्वरांनी सजले, तर ऐकायला गोड वाटतात. ध्वनिची तीव्रता ही ‘डेसिबल’ या एकतात (परिमानात) मोजतात. म्हणजेच ध्वनीचे मापन हे डेसिबल मध्ये करतात.
1)कारखाने व उद्योग धंद्यातील आवाज: अनेकदा कर्कश आवाजापासून मुक्तता व्हावी म्हणून लोक नाईलाजास्तव कानात कापसाचे बोळे घालतात. यंत्राच्या मोठा खडखडाट होतो. कारखान्यांच्या आवाजाची तीव्रता 100 ते 120 डेसिबल असते. त्यासबंधी कायदे पाळण्याबाबत अनास्था दिसते. ध्वनि प्रदूषण नियंत्रण व्यवस्था नियंत्रणाचे काम प्रभावीपणे करत नाही. कारखान्यांद्वारे होणार्या ध्वनिप्रदुशनामुळे बहिरेपणा येतो.
2) वाहनांचे ध्वणीप्रदूषन :स्वयंचलित वाहने, विमाने, रॉकेट, ट्रक, कार, ट्रॅक्टर, स्कूटर, रिक्षा, मोटर सायकली, मोटारी, रेल्वेगाड्या यांच्या आवाजामुळे ध्वणीप्रदूषण होते. इंजिन व हॉर्न यांच्या कर्कश आवाजाने ध्वनिप्रदूषणात भर पडते. उपग्रह प्रक्षेपणाचे हवाईउड्डाण होतांना असहय आवाज निर्माण होतो. मोठ्या शहरांमध्ये सदैव वाहनाची वर्दळ असते. रेल्वे गाड्यांची रात्रंदिवस ये-जा चालू असते. त्यामुळे त्यांच्या त्या खडखड आवाजाने शहरात व महामार्गाच्या परिसरात ध्वनीचा खडखडत निर्माण करते. विमानतळावर विमान उड्डाण करताना व विमान उतरताना ध्वणीप्रदूषण होते. ट्रक, ट्रकटर्स यांच्याही आवाजामुळे ध्वणीप्रदूषण होते. बाजारपेठेतूनही विक्रेत्यांची आरडाओरड व वाहनांद्वारे ध्वणीप्रदूषण होते.
3) घरगुती आवाज व सार्वजनिक करमणूक केंद्र :घरात फ्रीज, मिक्सर, कपडे धुण्याचे यंत्र, प्रेशरकुकर, दळण यंत्रे, याचबरोबर टी.व्ही., रेडियो, पंखे वाद्ये यांचा आवाज तीव्र केल्याने ध्वणीप्रदूषण होते स्वयंपाक घरातील भांड्यांची खडखड, सतत बडबड करणे, तसेच सतत भांडणे व धार्मिक कार्यक्रम यातूनही ध्वनि प्रदूषण होते. तसेच चित्रपट गृहे, नाट्यगृहे, सर्कस, गाण्यांचे कार्यक्रम सादर करताना त्यातील लाउडस्पीकर मोठा केल्याने ध्वणीप्रदूषण होते. तसेच विविध वाद्यांचे एकदम मोठयाने ऐकू येणारे आवाज धोकादायक असतात. अशा नाट्यगृहेशेजारी रहिवाशांना या आवाजामुळे त्रास होतो, शांत झोप लागत नाही.
ध्वणीप्रदूषनाचे विविध परिणाम
1) ध्वणीप्रदूषनाचा आरोग्यावर होणारा परिणाम :कायमचा गोंगाट व कर्कश आवाजामुळे बहिरेपणा येतो. मानसिक स्वास्थ्य बिघडते. चिडखोरपणा वाढतो. निद्रानाश, अपचन, दुर्बलता, विस्मरण इ. निर्माण होते. गोंगाटमुळे घाम येतो, चक्कर येतात, थकवा येतो. मानसिक विकृतींचे आजार बळावतात. ध्वणीप्रदूषनामुळे चांगली झोप लागत नाही, कार्यक्षमता घटते, मनाची एकाग्रता नष्ट होते. ध्वणीप्रदूषनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासवर परिणाम होतो. मानसिक आजारपण, भावनिक तान, वाढतो. काम करण्याची शक्ति कमी होते. उत्साह कमी होतो, लगेच थकवा येतो, अभ्यासात अडथळे येतात, गर्भवती स्रीच्या गर्भावर, तसेच तिच्या वडीवर अनिष्ट परिणाम होतो. ध्वणीप्रदूशनापासून त्रास होऊ नये म्हणून काही लोक झोपेच्या गोळ्या घेतात, तसेच धूम्रपान सेवन करून व त्यातून आजार वाढून अशक्तपणा येतो. छातीत धडधड होते, हृदयाच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. व त्यामुळे रक्तदाबासारखा आजार उत्पन्न होतो. व त्यामुळे अनेक रोगांत वाढ होते.
2) पक्षी, प्राणी व ध्वणीप्रदूषण :प्रचंड ध्वनिमुळे पक्षी, प्राणीही अस्वस्थ होतात. ते घाबरून इतरत्र स्थलांतर करतात. प्राण्यांची वाढ खुंटते. प्राणी पक्षी सैरभैर होतात, हरिण, हत्ती इ.वन्यजीव आळशी बनतात. व त्यामुळे त्यातच त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे प्राण्यांपाशी ध्वणीप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी.
ध्वनिप्रदुषनावर उपाय
1) आवाज कमी करण्यावर उपाय : कारखान्यातील यंत्रे व सर्व प्रकारच्या वाहनांचा आवाज कमी करणारी यंत्र सामग्री शोधणे, व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्राचे आवाज कमी करणारी उपकरणे निर्माण करणे उपयुक्त ठरेल. तसेच यंत्रांना सायलनसर बसवावेत.त्याच प्रमाणे सर्व वाहनांना ते नीट बसलेले आहे की नाही ते चेक करून ते चालतात की नाही याची खातरदारी केली पाहिजे. कमी आवाज करणार्या यंत्राचा व शांतता राखणार्या साधंनांचा वापर करावा, मोठा आवाज निर्माण करणारी साधने कमी वापरावी.
2) कायद्याची कडक अमलबजावणी : ध्वणीप्रदूषण करणार्यानवर व ध्वणीप्रदूषनाला मदत करणार्यांवर कायदेशीर कडक कारवाई करावी. त्यासाठी लोकांनी सामाजिक दृष्ट्या सहकार्य करावे. केंद्र व राज्य सरकारांनी कायद्याची कडक अमलबजावणी करावी. भारतात एअर पोल्युशन अक्ट १९८१, ध्वणीप्रदूषण नियमन व नियंत्रण नियम २००० इत्यादि कायदे उपयुक्त आहेत. ध्वनिप्रदूषनाची कारणे
3) जनजागृती : ध्वणीप्रदूषनामुळे कोणते दुष्परिणाम होतात. त्याची माहिती वृत्तपत्रे, दूरदर्शन, आकाशवाणी इ. प्रसारमाध्यमातून समाजाला करौन द्यावी. आवाजावर नियंत्रण ठेऊन सौम्य आवाजाचा उपयोग करावा. याची माहिती समजापर्यंत पोहचाववी. मानसिक शारीरिक आजार, बहिरेपणा, चिडचिड, तापटपणा, अस्वस्थता इ. विकारांची माहिती द्यावी. व शांततेचे महत्व पटउण द्यावे. तसेच ध्वणीप्रदूषनापासून वाचण्यासाठी कानात इयर प्लग वापरावेत, तसेच कानात कापसाचे बोळे घालावे.
फोटो छायांकन- इंटरनेट
सादरकर्ता - विकास अशोक दौंड
एम.जे.एम.सी. प्रथम वर्ष
के.टी.एच.एम. कॉलेज